लातूर / औसा – संत गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा व यात्रा महोत्सवातील अखेरची पालखी नगर प्रदिक्षणा, तेरणेच्या काठावर काला झाला.मंदीर सभागृहात नामवंताची भारुड आणि राज्यातील अनेक नामवंत फडातील लहान मोठ्या मल्लांनी हजेरी लावली. जवळपास १२५ कुस्त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर अंतिम अटीतटीच्या झालेल्या कुस्तीत पार्थ कळंत्रे कोल्हापुर यांच्यावर अक्षय शेळके टाका यांनी विजय मिळवून गणेशनाथ केसरी पुरस्कार पटकावला.
तालुक्यातील उजनी येथे ३७७ वर्षाची परंपरा असलेला श्री संत गणेशनाथ महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा व यात्रा महोत्वाची सुरुवात दिपावली पाडव्या दिवशी होते. तब्बल पंधरा दिवस चाललेल्या या सोहळ्यात रात्रंदिवस कार्यक्रमाची रेलचेल होती. या सोहळ्याच्या शेवटच्या चार दिवसात पालखी प्रदिक्षणा, शोभेची दारु, सोंग, शास्त्रीय गायन, काला, कुस्त्या अशा अनेक कार्यक्रमाची वाढ असते. यामुळे या शेवटच्या टप्यात भाविकांची एकच गर्दी झाली होती.या गर्दीत भाविक भक्तांना त्रास होवू नये. यासाठी भादा पोलिसांची चोख बंदोबस्त ठेवला होता. यामुळे भक्तांचे मोबाईल आशा किरकोळ घटना शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
या महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी दुपारी संत गणेशनाथाची पालखी प्रदिक्षिणा दुपारु २ वा. सुरु झाली. ४ वा. तेरणेच्या काठावर महाआरती झाल्यानंतर बासी काला महाप्रसाद झाला. यानंतर गोपाळपुरात टाळ मृदंगाच्या साथीने ज्ञानोबा तुकारामाचा गजर झाला. मारुती, बालाजी, बिल्लेश्वर, राम मंदीरासमोर आरती करीत पालखी मंदीरात पोहंचली.
पालखी प्रदिक्षिणा बाजार चौकात आल्यानंतर कुस्त्याचा फड लहान मल्लांच्या कुस्त्यांनी सुरु करण्यात आला.लहान मुलामध्ये कुस्त्यांची आवड निर्माण व्हावी यासाठी लहान कुस्त्यांचे विशेष आयोजन करण्यात येते. मात्र या लहान कुस्त्याच रसिकांना खिळवून सोडताना दिसत होते.यावर्षी जवळपास ४०- ५० कुस्त्या झाल्या. यानंतर सोलापुर,धाराशिव, लातूर, बीड, पुणे, कोल्हापुर येथील मल्लांच्या कुस्त्या झाल्या.उपविजेते पदासाठी राहुल मुळे हातलाई व प्रशांत जाधव कोंड यांच्यात झाली. तर दोन मुलींच्या कुस्त्या यावेळी झाल्या. साक्षी गरड व श्वेता कार्ले यांनी विजय मिळवून उजनीचे मैदान गाजविले.
बाबुराव ढवण, बसवराज बरदापुरे, बब्रुवान मुकडे, काशीनाथ सगट, वैजनाथ पाटील, अरुण मुकडे, भागवत जाजू यांनी पैलवानांना जोड लावून कुस्ती निकाली निघेपर्यंत पुढाकार घेतला. सरपंच युवराज गायकवाड,माजी सभापती योगीराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष राज पाटील यांच्या हस्ते उपविजेत्या मल्लांना पारितोषिक देण्यात आले. तर या स्पर्धेतील विजेता अक्षय शेळके यांना मानाचा फेटा घालून गणेशनाथ केसरी पारितोषिक मंदीर समितीचे अध्यक्ष धनराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस. एस. सय्यद,शेखर चव्हाण, मजहरखान पठाण, रफीक शेरीकर, चाँदपाशा तांबोळी,सुरेश गायकवाड, मुक्तार शेरीकर आदी उपस्थित होते. या कुस्ती स्पर्धेचे सुत्रसंचालन गोविंद घारगे, डेव्हिजन देशमुख यांनी केले.
कक्कया समाजबांची हॕटट्रीक पुर्ण
उजनी येथील वीरशैव कक्कया समाज बांधवांनी गेल्या दोन वर्षापासून एकत्रित येवून अल्पोहराची व्यवस्था सुरु केली आहे. या वर्षी दर्शनासाठी आलेल्या जवळपास सर्व भाविकांनी याचा लाभ घेतला आहे.




















