सोयगाव / संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या प्रेरणेने शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी समग्र शिक्षा गीता तांदडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे,गट समन्वयक सचिन पाटील यांच्या अधिपत्याखाली सोयगाव तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी तालुकास्तरीय मुंबई येथून आलेले अलिम्को चे डॉ.हर्ष विश्वकर्मा डॉ.कोमल फळ,डॉ.अक्षय मोरे ह्या तज्ञ मार्गदर्शक यांच्या मार्फत तपासणी करून साहित्य साधने साठी रेफर करण्यात आले, व सन.२०२४-२०२५ मध्ये अलिम्को साहित्यासाठी पात्र केलेले विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोठी व्हील चेअर,छोटी व्हील चेअर, कमोड चेअर व श्रवण यंत्र असे साहित्य साधनांचे वाटप करण्यात आले, त्याचबरोबर शालेय तपासणी मध्ये रेफर केलेले विद्यार्थ्यांना शालेय आरोग्य तपासणी टीमचे प्रमुख मेडिकल ऑफिसर डॉ.खलीद जकी,डॉ.रमेश चव्हाण, लेडीज मेडिकल ऑफिसर श्रीम.पठाण अखतरीत,यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी जिल्हास्तरावरील शस्त्रक्रिया व इतर सुविधा चा लाभ घेण्यासाठी रेफर केले.
सदरील शिबिरासाठी जिल्हास्तरीय अपंग समावेशित शिक्षणचे विभागाचे जिल्हा समन्वयक गणेश बेडके व अविनाश बावणे यांनी उपस्थित राहून शिबिरासाठी आलेले दिव्यांग विद्यार्थी व त्यांचा पालकांना मार्गदर्शन केले.
सदरील शिबिराच्या यशस्वीतेसाठी सोयगाव तालुक्यातील सर्व केंद्रीय विशेष तज्ञ शिक्षक सुनील बावचे,कैलास लांडगे, जगन्नाथ काकडे,हफीजोद्दीन शेख,प्रतिज्ञा सोनवणे,संगीता पाटील,यांनी विशेष मेहनत घेतली.त्याच बरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोयगाव चे केंद्रीय मुख्याध्यापक किरण पाटील,गटसाधन केंद्राचे कनिष्ठ सहाय्यक सुनील शेटे,दीपक पाटील,आदींनी सहकार्य केले .
सदरील शिबिराचे अध्यक्षस्थान सोयगाव केंद्राचे केंद्रप्रमुख फिरोज तडवी यांनी भूषवले तर शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिनाजी खंदारे, जिल्हा समन्वयक गणेश बेडके,अविनाश बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सोबत फोटो –


















