मोडनिंब – भेंड (ता. माढा ) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत संजीवनी सेवा ट्रस्ट पंढरपूर, ग्रामपंचायत भेंड आणि रोटरी क्लब ऑफ मोडनिंब यांच्या वतीने एक दिवसीय सर्व रोग निदान तसेच हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी डॉ. सिद्धनाथ कदम आणि एन. आर. सय्यद यांनी निरोगी आरोग्यासाठी नियमित तपासण्यांचे महत्त्व, योग्य उपचार पद्धती आणि जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले.त्यांनी केलेल्या सविस्तर सूचना व मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये आरोग्यजागृती वाढण्यास मोठी मदत झाली.
या शिबिरामुळे भेंड गावातील नागरिकांना विविध आरोग्य तपासण्या एकाच ठिकाणी करण्याची संधी मिळाली. हिमोग्लोबिन तपासणीसह सर्व रोग निदान केल्याने अनेकांना स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक होण्यास आणि आवश्यक ती वैद्यकीय काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळाले.शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश गिड्डे, डॉ. सुप्रिया शेळके,अनिल शिंदे, डॉ. शशिकांत वागज, सुनील रेपाळ, डॉ. कैलास गुजरे,, एन. आर. सय्यद, आर. आर. सय्यद, प्रवीण गायकवाड, प्रकाश सुरवसे, बाळासाहेब भोगे, महेश मते आणि गोविंद मते यांचे योगदान राहिले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी शुभम जाधव व सूरज मुलाणी यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. संतोष दळवी यांनी सर्व मान्यवर, डॉक्टर, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आभार मानले.या शिबिराला ग्रामस्थ, महिला व जेष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

















