सोलापूर – मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने ५१ हजार १११/-₹ चा बळीराजा प्रती कर्तव्याचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.
मराठवाड्यासह लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाच्या हाता,तोडी आलेला घास गेला आहे इतकेच नव्हे तर मुके पाळीव जनावरे,आपतेस्ट याना मुकावे लागले आहे ,उपजीविकेसह स्वप्नाचा चुराडा झाला आहे.
राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमचे मार्गदशक अँड व्यकटराव जी बेंद्रे साहेब यांच्या सूचनेवरून अखिल भारतीय संतुजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹ ५१,१११/-₹ (एकवन्न हजार एकशे एक रुपये) बळीराजा प्रती कर्तव्याचा धनादेश आज माननीय उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गोरगरीब जनतेसह बळीराजा नक्कीच या नैसर्गिक आपत्तीवर मात करून नव्या जोमाने उभारी घेणार असा दृढ विश्वास व्यक्त करतो आहे.