रेणापूर / लातूर – पानगांव येथील पनेगेश्वर साखर कारखाना शेतकरयांच्या जिवनात आर्थिक मदत व्हावी म्हणून लोकनेते गोपिनाथराव मुंडे साहेबानी उभा केला त्यांच्या काळात तो व्यवस्थीत पन चालला त्यांच्या निधनानंतर पन्नगेश्वर कारखानान्याची धुरा मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आली त्यांच्या कार्यकाळात कारखाना दिवाळखोरीत गेला व चार वर्ष कारखाना बंद होता . त्यानंतर कोनत्याही शेतकरयांना कर्मचारी यांना कसलीही कल्पना न देता मंत्री पंकजा मुंडे यांनी हा कारखाना विमल अग्रो या आ . अक्षय मुंदडा यांच्या कंपणीला विकला आसुन विमल ॲग्रो या कंपनीने कारखाना हंगाम चालू पण केला आहे .
परंतू विमल ॲग्रो कंपनीने शेतकरयांचे शेअर्स लॅप्स केले आसुन शेतकऱ्यांचे थकलेले बिल, कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन, वाहतूक दरांचे थकलेली बिले देण्यास नकार दिला असून कारखान्याचे नवीन शेअर्स विकत घ्यावे जुन्या शेअरची व शेतकऱ्यांच्या बिलाची व कर्मचाऱ्यांच्या पगार अशी आमचे काहीही देणे घेणे नाही असे म्हणून नकार दिला आहे .
याबाबतीत वेळोवेळी मनसे नेते संतोष नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळी आंदोलन करून सुद्धा कारखाना प्रशासक कसलीही दाद देत असल्यामुळे आज दिनांक 27 रोजी पनकेश्वर कारखान्याच्या गेट जवळ ठिय्या आंदोलन करण्यात येऊन दोन तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पुढील आंदोलनाची दिशा ठरवली ठरवली जात असून यापुढील भूमिका आक्रमक असेल मनसे नेते संतोष नागरगोजे यांनी मत व्यक्त केले .यावेळी श्री संतोष नागरगोजे .ईश्वर नाना गुडे .गोविंद दुड्डे .सुरेश भंडारे .गोविंद बापू नरारे .चंद्रकांत भंडारे .चेतन चव्हाण .यांच्यासह अनेक शेतकरी .कर्मचारी .व कर्मचारी उपस्थित होते .



















