जाफराबाद – शहर व तालुक्याच्या वतीने स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली कार्यक्रमास सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, प्रशासनातील अधिकारी, व्यापारी संघ, डॉक्टर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या सार्वजनिक जीवनातील कार्य, प्रभावी नेतृत्वगुण व कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वाचा भावपूर्ण शब्दांत आढावा घेतला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या श्रद्धांजली सभेस माजी आमदार चंद्रकांत दानवे, धनगर समाजाचे नेते दिपक बोऱ्हाडे, नगराध्यक्ष दिपक पाटील वाकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष दत्तू अंभोरे, शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, माजी नगराध्यक्ष संजय लहाने, नगरसेवक सुरेश दिवटे, नगरसेवक तालेब पठाण, रघुनाथ पंडित, सुरेश गवळी, अमोल शिंदे, नायब तहसीलदार मिसाळ,विशाल वाकडे, पोलीस निरीक्षक सतीश जाधव, गटविकास अधिकारी मगर, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू गायकवाड, राजू जाधव, मोहन मुळे, मदन कोरडे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी उद्धव दुनगहु, गणेश लोखंडे, मयूर बोर्डे, फारख कुरेशी, चेतन बायस शेख कौसर, प्रभू गाढे, सचिन सोरमारे, सुनील सगट, साबेत चाऊस, मुन्ना ठाकूर, सुनील भोसले, नितीन गौतम, वसीम जागीरदार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पाबळे यांनी केले.






















