सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान सोलापूर शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते विकास तसेच नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर सकारात्मक संवाद झाला.
यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीकोनातून सर्व प्रश्न गांभीर्याने घेतले जातील व संबंधित पातळीवर पाठपुरावा करून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर सहकार्य करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
या चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी विविध विषय मांडत सोलापूरच्या विकास आराखड्याबाबत आपले मत व्यक्त केले.
























