करमाळा- तालुक्यातील आवाटी येथील सीना नदीकाठी असलेल्या पूरग्रस्तांना आज आवाटी येथील हजरत वली चांद पाशा दर्गाह ट्रस्टच्या वतीने किराणा सामानाचे संच वाटण्यात आले पूरग्रस्तांना एक प्रकारे मदतीचा हात म्हणून दर्गाह ट्रस्टने आवाटी गावातील सीना काठी असलेल्या पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचे किराणा सामान वाटप केले
:आवाटी ता. करमाळा येथील वलीबाबा दर्गाह ट्रस्टच्या वतीने सिना नदीला आलेल्या पुरात बाधित झालेल्या पूरग्रस्तांना दीडशे जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. वली बाबा दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष तथा बार्शी चे माजी नगराध्यक्ष कादरभाई तांबोळी, बार्शीचे माजी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी वलीबाबाचे खादीम गुलामनबी कादरी, इरफान कादरी तसेच हसनेन कादरी यांच्या हस्ते दीडशे पूरग्रस्तांना दीड लाख रुपये किमतीचे जीवनावश्यक वस्तूच्या किट वली बाबा दर्गाह मध्ये वाटप करण्यात आले. सिना नदीला आलेल्या महापुराचे आवाटी गावातील घरात पाणी शिरल्याने गावातील अडीचशे नागरिकांना वलीबाबा दर्ग्याच्या समाज मंदिरात आश्रय देण्यात आलेला होता. त्यावेळी पुरग्रस्तांना दोन वेळचे भोजन चहा, नाष्टा,कपडे दर्गा ट्रस्टच्या वतीने देण्यात आले. यावेळी सीना नदी काठी असणारे बहुसंख्य बाधित पूरग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी मा. सरपंच साबीर खान, मकाई साखर कारखान्याचे संचालक गोकुळ नलवडे, दादासाहेब बंडगर, मनोज नलवडे, कांचन कांडेकर,मुख्तार पटेल, हाजी खालिद काझी,नसरुल्ला खान, राजू खान, रफिक खान, रुस्तुम खान, असिफ खान आदी उपस्थित होते.