सोलापूर : महानायक पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त आज जागृती शनि धाम कर्णिक नगर रोड सोलापूर येथे पद्मविभूषण महानायक डॉ अमिताभ बच्चन सेवाभावी संस्थेच्या वतीने अंबादास बत्तीन, मुकेश महिंद्रकर यांच्या हस्ते भक्तांना लाडू वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय इप्पाकायल, वसंत संदा, संजय भुतडा, श्रीनिवास कुडक्याल, अनिल बुरांडे प्रमुख उपस्थिती होते. यावेळी सुपरस्टार अमिताभ बच्चन चा विजय असो, जय महानायक ,जय जय महानायक, तुम जियो हजारो साल अशा घोषणा देण्यात आल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंजन सज्जन, किशोर म्हैत्रे ,रमेश सुंचू ,राजकुमार घटी, श्रीनिवास येलगेटी, राजू कोळी, रमेश शेट्टी, राजेश बिज्जा , सुरेश ममाने,डेव्हिड काळे, नागेश कंदीकटला आदींनी परिश्रम घेतले. यावेळी महानायक प्रेमी व सेवाभावी संस्थेचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.