श्रीपूर – श्रीपूर ता . माळशिरस येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास उसाचा पुरवठा होत असलेल्य ट्रक, ट्रॅक्टर, बजाट यावाहनांना अकलूज विभागाचे उप-विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांचे हस्ते व कारखान्याचे संचालक तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, .शामराव साळुंखे व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत रिप्लेक्टर लावण्यात आले .
यप्रसंगी अकलूज विभागाचे उप-विभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना विना-अपघात वाहन चालवणेबाबत सुचना करत महाराष्ट्र राज्याच्या वाहन कायदयामध्ये सुधारणा झाली असून यात अपघात होऊन सुद्धा ड्रायव्हरने त्या अपघाग्रस्त व्यक्तीकडे दुर्लक्ष करून निघून गेल्यास त्याच्यावर कडक कायदेशिर कारवाई करण्यात येत आहे. तरी सर्व वाहन चालकांनी याची नोंद घेऊन आपल्या वाहनामुळे इतर कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सांगितले .
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी वाहन चालकांनी रस्त्यावरून वाहन चालवीत असताना टेप रेकॉर्डर लावू नये. मोबाईलवर बोलू नये. तसेच दुसऱ्या वाहनास ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये. पाठीमागून व समोरुन येणाऱ्या वाहनाबरोबर अपघात होणार नाही याची खबरदारी घेणेच आवाहन केले .
या प्रसंगी कारखान्याचे प्रोडक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी,केन मॅनेजर एस.सी.कुमठेकर, चीफ अकौटंट आर.एम. काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ . सुधीर पोफळे ,वर्क्स मॅनेजर ए.डी. बारटक्के, चीफ इंजिनियर एस. एस.विभुते, शेती अधिकारी एस.पी. भालेकर, सिव्हील इंजीनिअर एच एस.नागणे कॉम्प्युटर इन्चार्ज टी.एस.भोसले, कार्यालयीन अधीक्षक बी.एस.बाबर पर्यावरण अधिकारी सचिन ताम्हाणे, केन यार्ड सुपरवायझर राहुल साठे आदी उपस्थित होते.

















