अक्कलकोट – विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात आभ्यासाबरोबर खेळांचेही महत्वाचे योगदान असल्याचे मनोगत येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे व कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचे सुपूत्र देवस्थानचे युवा नेते प्रथमेश इंगळे यांनी व्यक्त केले. नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलीत कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या क्रीडांगणात विद्यार्थिनी मुलींचे थ्रो बाॅल स्पधेॅचे उदघाटन देवस्थानचे युवा नेते प्रथमेश महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथमेश इंगळे बोलत होते.
यावेळी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे प्राचार्य नागनाथ जेऊरे, विजयकुमार पवार सर, सचिन घाटगे सर, उमेश सोनवणे, बंटी नारायणकर, विपूल कडबगांवकर, दर्शन घाटगे, धनराज स्वामी आदींसह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन मध्ये अश्वमेध क्रिडा स्पर्धाचे
उद्घाटन करताना प्रथमेश इंगळे, प्रा.नागनाथ जेऊरे व अन्य दिसत आहेत.

















