बार्शी – विश्व हिंदू परिषदेच्या बैठकीत बार्शीतील अमर शुक्ला यांची बार्शी प्रखंड मंत्री म्हणून निवड करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेची सोलापूर विभागाची बैठक नुकतीच शिवस्मारक सोलापूर येथे झाली.
यात बार्शी प्रखंडातील कार्यकर्त्यांकडे विविध पदांची जबाबदारी देण्यात आली. यात गोविंद शिंदे – प्रखंड सहमंत्री, विनोद साळुंके – प्रखंड सहमंत्री, शिरीष जाधव- प्रखंड संयोजक, विजय साठे – प्रखंड सहसंयोजक, सोनू जव्हेरी – प्रखंड सहसंयोजक, परशुराम डोंबे (महाराज) – प्रखंड अध्यक्ष, सागर क्षीरसागर- प्रखंड उपाध्यक्ष, महेश गुरव- प्रखंड मंदिर पूजक अर्चक प्रमुख, ऋषिकेश पवार- मठ मंदिर संपर्कप्रमुख, सिद्धेश्वर कापसे – मठ मंदिर संपर्क सहप्रमुख, ऋषिकेश भुजबळ – प्रचार प्रसार प्रमुख अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या.
या बैठकीस विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री दादा वेदक, पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, नागनाथ बोंगरगे, प्रांत धर्म जागरण सहप्रमुख- जयसिंगराव पाटील, विभाग मंत्री, सोलापूर, विजयकुमार पिसे, विभाग सहमंत्री सोलापूर, संजयकुमार जमादार जिल्हा मंत्री सोलापूर, बापूसाहेब कदम जिल्हा सहमंत्री सोलापूर, विष्णु जगताप, जिल्हा सहमंत्री सोलापूर, बाबू गिरगल, जिल्हा सहमंत्री सोलापूर, शिवाजीराव जाधव, जिल्हा मंत्री पंढरपूर, गोपाल सुरवसे, जिल्हा सहमंत्री पंढरपूर यांच्यासह सोलापूर विभागातील बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्ती आदी सर्व विभागांचे कार्यकर्ते उपस्थित होते.




















