अमजद शेख यांची अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड: तालुक्यातील भार्डी येथील अमजद शेख यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भाजपाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अंबड तालुका उपाध्यक्षपदी निवड केली.
भाजपा नेते सतीश घाटगे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. भार्डी गावात देखील त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. या निवडीबद्दल त्यांचा सरपंच नवनाथ डोईफोडे, उपसरपंच नासेर भाई व गावकऱ्यांनी सत्कार केला.