सांगोला – सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी रामचंद्र जानकर तर उपाध्यक्षपदी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड यांची निवड करण्यात आली.
आनंद विद्यालय, कमलापूर (ता.सांगोला) येथे निवडणूक कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी प्राचार्य उत्तमराव लवटे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी नियंत्रक समितीचे अध्यक्ष प्रा.सुभाषराव माने, सचिव रंगसिद्ध दसाडे, सिद्राम खट्टे, रेवणसिद्ध रोडगीकर, समन्वयक तानाजीराव माने उपस्थित होते.
या निवडीबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्राचार्य अमोल गायकवाड यांचे अभिनंदन केले.


















