सोलापूर – अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील ८२ गावे बाधित झाली आहेत. युगंधर फाउंडेशन सोलापूरच्या वतीने सीना तेलगाव, पाथरी ही दोन गावे दत्तक घेतली आहेत. संस्थेच्या वतीने पूर परिस्थितीमध्ये शेतकरी आणि नागरिकांना मदत केली आहे.
औषधे, अन्नपदार्थ, दिवाळीचे किट , कपडे , सॅनिटरी, नॅपकिन आदी साहीत्याचे वाटप करण्यात आले . पावसामुळे शाळा पाण्यामध्ये बुडाले असल्याने शाळेतील शैक्षणिक साहित्य ,विद्यार्थ्यांचे साहित्य व पोषण आहार पाण्यामुळे खराब झाले आहे.
तेलगाव येथील शाळेचे पुरामुळे नुकसान झाले असून पहिली ते सातवी वर्गातील ८० मुले व ८६ मुली असे १८६ विद्यार्थ्यांचे शालेय साहीत्यांचे नुकसान झाले आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन युगंधर फाऊंडेशन सोलापूरच्या अध्यक्षा प्रा. रेश्मा माने यांनी आवाहन केली आहे.
















