सोलापूर : जिल्हा माध्यमिक व उच्चमाध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सोलापूर यांच्यावतीने बालाजी अमाईन्स च्या संचालकमंडळाकडे सोलापूर व परिसरातील शाळांमधिल गरजु विदयार्थाना आर्थिक परिस्थितीमुळे दहावीच्या परिक्षेपुर्वी सरावपरिक्षेचा अभ्यासकरण्याकरीता २१ अपेक्षित प्रश्नसंच मिळावे अशी मागणी केली होती बालाजी अमाईन्सच्या वतीने मागिल दोन वर्ष अपेक्षित संच सोलापूर व धाराशिव जिल्हयातील शाळांना देत आहे या प्रमाणे यंदाच्यावर्षी संचालक मंडळ प व्यवस्थापकीय संचलक राम रेडडी यांनी सोलापूर व धाराशिव जिल्हयातील निवडक शाळांतील गरिब विदयार्थ्यांकरीता दहावी चे अपेक्षित प्रश्नसंच देण्याचा निर्णय केला.
बालाजी अमाईन्स च्या कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी व पुर्णवेळ संचालक श्री राजेश्वर रेडडी यांच्या हस्ते दहावीच्या अपेक्षित संचाचे वाटप सोलापूर शहर मोहोळ तालुका व उत्तर सोलापूर तालुक्यातील शांळांना करण्यात आले. या प्रसंगी बालाजी अमाईन्स सीएसआर विभागप्रमुख अनिल विपत, मुख्याध्यापक संघाचे प्राचार्य शंकर वडणे, जिल्हा संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती चे गुरुनाथ वांगीकर, रानमसले ब्रम्हगायत्री शाळेचे घोडके, पाटील झाडबुके, महादेव गवळी, सारंग पाटील यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी अनिल विपत व शंकर वडणे यांनी बालाजी अमाईन्सच्यावतीने दरवर्षी १० वीच्या विदयार्थ्यांना देण्यात येणा-या अपेक्षित प्रश्नसंच मुळे उत्तर सोलापूर व मोहोळ परिसरातील शाळांमधिल गरिब व होतकरू मुलांना याचा फार उपयोग होतो व सराव परिक्षेचा अभ्यास करण्यास मदत होते या बददल बालाजी अमाईन्सच्या संचालक मंडळाचे व व्यस्थापकीय संचालक राम रेडडी सरांचे आभार मानले.
या कार्यकमास बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर, अमोल गुंड व शाळांमधल शिक्षक व मुख्याध्यापक उपस्थित होते. सोलापूर शहर, उत्तर सोलापूर तालुका व मोहोळ तालुक्यातील शाळांना अपेक्षित प्रश्नसंच भेट देण्यात आले.
चौकट
या शाळांना देण्यात आले अपेक्षितसंच भेट
सोलापूर शहरः १. श्री शरदचंद्र प्रशाला, २. श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल ३. एस के बिराजदार हायस्कुल
उत्तर सोलापूर तालुका : १. श्री शिवप्रभु माध्यमिक व उच्चमाध्यमिक महाविदयालय अकोलेकाटी, २. नालंदा माध्यमिक आश्रम शाळा भोगाव, ३. ब्रम्हगायत्री विदयालय रानमसले ४. न्यु हायस्कुल कनिष्ठ महाविदयालय वडाळा ५ जी. बी. घोडके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय नान्नज 6. श्री गणेश विदयालय बीबीदारफळ , 7. जिजामाता प्रशाला कोंडी 8. सावित्री कन्या प्रशाला रानमसले
मोहोळ तालुका : १. श्री दत्तप्रशाला मोहोळ स्टेशन, २. श्री अंबिका विद्यामंदिर शिरापूर, ३. समता विद्यालय सावळेश्वर, 4.माध्यमिक विद्यालय चिंचोली कटी

























