छत्रपती संभाजीनगर – कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या मार्केटिंग विभागातील कर्मचारी शंकर साबळे यांनी प्रामाणिकतेचा आदर्श घालून दिला आहे.
जालना येथील डॉ. भूषण मणियार यांच्या आईला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करताना १.५ लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग बिलिंग काउंटरवर विसरली गेली होती.
साबळे यांनी ती बॅग सापडताच क्षणाचाही विलंब न करता तिच्या मालकाकडे सुरक्षित परत केली.
त्यांचे हे अनुकरणीय कृत्य कमलनयन बजाज हॉस्पिटलच्या प्रामाणिकपणा, करुणा आणि नैतिक आचरण या मूल्यांचे खरे प्रतिबिंब असल्याचे प्रशासनाने सांगितले असून, साबळे यांच्या प्रामाणिकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




















