बार्शी – सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी टिचिंग विथ इंटेन्शन” या विषयावर प्रभावी फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम यशस्वीपणे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश आधुनिक शिक्षकांच्या अध्यापन पद्धतींमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे, पारंपरिक पद्धतींपलीकडे जाऊन उद्देशपूर्ण व विद्यार्थी-केंद्रित शिक्षण स्वीकारणे असा होता.
या कार्यक्रमास नामांकित सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षक आणि वक्ते श्री. राहुल उपाध्ये (डायरेक्टर, भास्कर सॉफ्ट स्किल्स ट्रेनिंग सेंटर, सोलापूर) यांची उपस्थिती लाभली. प्रभावी संवाद कौशल्य, अध्यापन शास्त्रातील सखोल समज आणि गतिमान सादरीकरणासाठी ओळखले जाणारे श्री. उपाध्ये यांनी चिंतनशील चर्चा, व्यावहारिक मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील शिक्षक–विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवांवर आधारित उदाहरणांद्वारे सत्र समृद्ध केले.
डॉ. संजय बायस- प्राचर्य फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी, यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. सुजीत करपे यांच्या उपस्थितीत झाली. त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. वेगवेगळ्या महाविद्यालयातील एकूण ७१ शिक्षकांनी यामध्ये सहभाग नोंदवला व सर्व सहभागी शिक्षकांनी सत्राबद्दल समाधान व्यक्त केले. या एफ. डी.पी. ने त्यांच्या अध्यापन प्रवासाला एक ताजेतवाने दृष्टीकोन दिला असून, उद्देश आणि उत्कटतेने विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा संकल्प आणखी दृढ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे समन्वयन श्री. शुभम मगर (ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर) यांनी करत कार्यक्रम सुरळीत आणि उत्साहपूर्ण पद्धतीने पार पडला. तसेच, रजिस्ट्रेशन कमिटीचे कार्य सहाय्यक प्राध्यापिका स्वरुपा ठावरे, स्वप्नील पोळ यांनी पाहिले.
संस्थेचे दूरदर्शी नेतृत्व अध्यक्ष अरुणदादा बारबोले व सचिवा श्रीमती कल्पनाताई बारबोले यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देत ग्रामीण महाराष्ट्रातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी सातत्याने शिक्षक-क्षमता विकासाची गरज व्यक्त करुन कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल शुभेच्छा दिल्या.


















