सोलापूर : पत्र्यावर का दगड मारता अशी विचारणा करणा-या वृध्दाला काठी तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही मारहाण माढा तालुक्यातील कुर्डू येथे गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास घडली.
छगन तुळशीराम धोत्रे (वय 77) असे मारहाण झालेल्या वृध्दाचे नाव आहे. छगन यांच्या घराच्या पत्र्यावर दगड टाकण्यात येत होते. गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास छगन यांनी काशीनाथ पवार व इतरांना घरावर दगड का मारता अशी विचारणा केली. त्यावर चिडून काशीनाथ पवार, महेश पवार व इतर दोन यांनी काठी तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली.
यात छगन यांच्या पायाला जखम झाली आहे. तसेच सर्वांगास मुकामार लागल्याने कुर्डूवाडी येथील सरकारी रुग्णालयात उपचार करून रात्री 11.40 वाजता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची नोंद झाली आहे.