बार्शी – भविष्यात उत्तम उद्योजक तयार व्हायचे असतील तर आनंद बाजारसारखे उपक्रम प्रशालेत आयोजित करावेत. तसेच प्रॉडक्ट, प्राईस, पब्लिसिटी, पीपल, असे पी ५ लक्षात ठेवावेत, असे विचार यशस्वी उद्योजक अभिजीत सोनीग्रा यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. शुभदा जोशी होत्या. या कार्यक्रमास सेकंडरी सोसायटीचे संचालक प्रमोद देशमुख, संस्था सचिव चिन्मय वालवडकर, नागनाथ देवकते, वैशाली कांबळे, वैष्णवी हातोळकर हे मान्यवर प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थिनींनी विविध खाद्य पदार्थ, फळे, भाजीपाला, दागिने, चहा, कडधान्ये इत्यादी वस्तूंचे ७० स्टॉल लावले होते. जवळपास २५ हजार रुपयांची उलाढाल या बाजारात झाली. नफा, तोटा, खरेदी, विक्री यासारख्या संकल्पना या बाजारामुळे विद्यार्थिनींना समजल्या.
खरेदी करण्यासाठी विदयार्थिनी व पालक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश घाडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले
























