सोलापूर:अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी निवडणूक बिनविरोध झाली नाही,उज्वला थिटे यांनी ऍड दत्तात्रय घोडके यांच्या मार्फत सोलापूरच्या जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले आहे.ऍड दत्ता घोडके यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपंचायत निवडणूकीच्या कायद्यात काय तरदूत आहे,त्याबाबत महत्वपूर्ण माहिती दिली.
उज्वला थिटे या अर्ज भरताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना त्रुटी सांगणे गरजेचे होते,तसेच न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक अधिकारी अनगर नगरपंचायतीची नगराध्यक्षा पदाची निवडणूक बिनविरोध झाली असे घोषित करता येत नाही अशी माहिती ऍड दत्ता घोडके यांनी दिली.


















