बार्शी – कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी शिस्तप्रिय, कार्यतत्पर, मनमिळावू व लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जाणारे अनिल बनसोडे यांची नुकतीच जिल्हा परिषद सोलापूर येथे सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक (उच्च माध्यमिक विभाग) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आपल्या कर्तव्यनिष्ठ, शिस्तबद्ध व प्रामाणिक कार्यशैलीमुळे अनिल बनसोडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि सहकारी अधिकारी यांच्यात त्यांनी नेहमीच संवादाचे, सहकार्याचे आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण निर्माण केले आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध शिक्षक संघटना, शिक्षणप्रेमी, सहकारी अधिकारी व नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

















