तभा फ्लॅश न्यूज/परवेझ मुल्ला : आपल्या प्रपंचागाडा या गावाहून दुसर्या डावात भटकंती करत पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत. त्यांना छताच्या निर्वाहसाठी जागा शोधून मुक्काम केला जातो. परंतु यास अपवाद जनावरांचा गेल्या अनेक दिवसांपासून बेवारस जनावरे ही दिवसभर रस्त्यावर जगतात चौका – चौकात डेरा टाकून बसतात आणि मुक्कामास कळंबच्या बस स्थानकावर करतात. यामुळे संपूर्ण स्थानक व परिसरात अस्वच्छता निर्माण झाल्याने प्रवाश्यांना घाणीतून प्रवास करावा लागत आहे.
दरम्यान, दुसरीकडे शहरात रस्त्यांवर मोकाट जनावरे मोकाट सोडून दिल्याने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, होळकर चौक, डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्थानक परिसर ढोकी नाक्यावर दिवसरात्र मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला असल्याने वाहतूकीस कोंडी निर्माण होवून वाहनास व पादचाऱ्यांना त्रास होत आहे.
या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून व नागरिकांतून करण्यात येत आहे.