अक्कलकोट – नुकत्याच नान्नज, बोरामणी येथील कुस्ती स्पर्धेतील यशा नंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्टस् क्लबचा क्रॉस कंट्रीत ही चौफेर डंका., झाला . रत्नागिरी येथे १९ वर्षीय गटात क्रॉस कंट्री स्पर्धेत कु. ज्योती बन्ने हिने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकाविल, हरयाणा येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे
ज्योती बन्ने हिच्या निवडीबद्दल क्लबचे अध्यक्ष व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षीय कक्षात प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी कु. ज्योती बन्ने हिचे अभिनंदन केले.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षात स्वामी कार्याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात न्यास हे उल्लेखनीय रित्या कार्यरत आहे. या प्रत्येक क्षेत्रात उज्वल कामगिरी अन्नछत्र मंडळ हे करीत आहे. नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेनंतर श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्टस् क्लबचा क्रॉस कंट्रीत ही डंका., रत्नागिरी येथे १९ वर्षीय गटात क्रॉस कंट्री स्पर्धेत कु. ज्योती बन्ने हिने महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकविली असून, हरयाणा येथे होणाऱ्या स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ स्पोर्टस् क्लबची कु. ज्योती बन्ने हिचे सर्वस्तरातून अभिनंदन व कौतक होत असून, क्लबच्या कामगिरी बद्दल ही समाधान व्यक्त होत आहे. या गौरवाप्रसंगी मार्गदर्शक प्रदीप राठोड, सचिन कुर्ले, शशिकांत अस्वले, बसवराज फुलारी, संदीप विभूते यांच्या सह क्लबचे सदस्य व अन्नछत्र मंडळाचे सेवेकरी, कर्मचारी आदीजण उपस्थित होते.


















