सोलापूर – तिल्हेहाळ येथील जागृत महादेव मंदिरच्या वर्धापन दिन विविध धार्मिक कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
यामध्ये मंगळवार,दि.२ डिसेंबर रोजी पहाटे विविध धार्मिक कार्यक्रम व सकाळी ७:१५ वाजता अभिषेक व महाआरती झाली, यावेळी पुष्पवृष्टी व फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. सुरजसिंग सुनीलसिंग चव्हाण नांदेड यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी तिल्हेहाळसह औज (आ.), होटगी स्टेशन, बोरुळ, आलेगाव येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























