मुक्रमाबाद- प्रतिनिधी
राज्यातला शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतीचा खर्च वाढला पण शेतीमालाचा भाव वाढला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला.कालच्या विधानसभा निवडणूकीत सत्ता आली तर शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी करू,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू (कर्जमुक्त करू) अशी घोषणा मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून करण्यात आली होती.त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने महायुतीला सत्ता दिली.आणि मा.देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले.आता दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी मा.ना.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मा.तहसीलदार राजेश जाधव यांच्यामार्फत शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी दिनांक 3 मार्च रोजी निवेदनातून केली आहे.
दिलेल्या शब्दाप्रमाणे 3 मार्च पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चालू व थकीत शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. दरवेळी थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होते.त्यामुळे चालू शेतकऱ्यांवर अन्याय होतोय.कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी होईल.शेतकऱ्याला मोकळा श्वास घेता येईल.सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी केली नाही तर शेतकरी सरकारच्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही आणि भविष्यात शेतकरी कर्जमाफीसाठी रस्त्यावर येईल.म्हणून सरकारने दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण कर्जमाफी जाहीर करावी अशा इशारा निवेदनात दिला आहे.