झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेप्रकरणी आज, सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने ईडीला येत्या 9 फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 12 फेब्रुवार रोजी होणार आहे.
गेल्या आठवड्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 7 तासांच्या चौकशीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली होती. यापूर्वी, ईडीच्या ताब्यात असलेल्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. हेमंत सोरेन यांनी अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान दिले होते. न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि बेला एम. त्रिवेदी यांच्या खंडपीठाने शुक्रवारी सोरेनची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले.यानंतर आता झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणी ईडीकडून उत्तर मागितले आहे.