नाशिक , 1 ऑगस्ट (हिं.स.) लोकसभेमध्ये देशाची विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी जातीय जनगणना व्हावी म्हणून देशातील जनतेचा आवाज उठवला त्याला प्रत्युत्तर देताना भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर व खासदार कंगना राणावत यांनी राहुल गांधींची जात विचारून बेताल वक्तव्य केले. खासदार अनुराग ठाकूर यांनी असविधानिक वक्तव्य देशाच्या संसदेत केल्यामुळे राहुल गांधींचा अपमान केल्यामुळे नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांनी जातीचा उल्लेख करत या देशांतील अनेक जातीय जनगणना व्हावी यासाठी आंदोलन करणाऱ्या जनतेच्या जातीचा अपमान केला आहे. राहुल गांधी यांना बलिदानाची परंपरा आहे. राहुल गांधी ज्या घरात जन्मले त्यांच्या पूर्वजांनी या देशासाठी प्राणाची आहुती दिलेली आहे त्यामुळे असे बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपने त्यांचा निषेध करून त्यांनी राहुल गांधी व जनतेची माफी मागावी, अशी मागणी या आंदोलनाच्या वेळी नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी केली.
शेतकऱ्यांचे प्रश्न बेरोजगारांचा प्रश्न महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न याबाबत न बोलता केवळ जातीयवादी वक्तव्य करून राहुल गांधी यांचा अपमान करत असताना देशातील लाखो लोकांचा अपमान अनुराग ठाकूर यांनी केला आहे.
त्यांना वेळीच आवर घातले नाही तर काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे मत आंदोलनाच्या वेळी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी केले. माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी भाजपवर टीका करत मनुवादी भाजपाचा निषेध नोंदविला याप्रसंगी राहुल गांधी जिंदाबाद, काँग्रेस पक्ष जिंदाबाद, मनवादी भाजपाचा धिक्कार असो, अशा घोषणांनी काँग्रेस भवन परिषद दुमदुमून टाकला. या आंदोलनाच्या वेळी अनुराग ठाकूर व कंगना राणावत यांच्या फोटोला चप्पल मारून कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला