सोलापूर – क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद पुणे व बारामती कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बारामती येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनीची बाजी मारली आहे ही स्पर्धा 22 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा क्रीडा संकुल बारामती येथे पार पडली
या स्पर्धेत 14 वर्षे गटात 22 किलो वजन गटातून अनुष्का दीक्षित हिने कांस्यपदक मिळवले आहे हिला प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आलेला आहे
या सर्व यशस्वी खेळाडूंना प्रशालेचे क्रीडा शिक्षक गुरुसिद्ध होर्तीकर, प्रचिता जोगदं जोगदांडे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थिनी व मार्गदर्शक शिक्षकांचे शालेय शिक्षण समितीचे चेअरमन सन्माननीय धर्मराज काडादी साहेब ,सन्माननीय भीमाशंकरजी पटणे , सन्माननीय गुरुराज माळगे , सन्माननीय डॉ राजशेखर येळीकर , सन्माननीय ॲड. रेवणसिद्ध पाटील, सन्माननीय चनबसप्पा नाडगौडा , सन्माननीय प्रभुराज मैंदर्गीकर , सन्माननीय विलास कारभारी , सन्माननीय पशुपतिनाथ माशाळ, समन्वयक संतोष पाटील, मुख्याध्यापिका संगीता गोटे , पर्यवेक्षिका सुनिता वाले यांनी अभिनंदन केले.



















