भोकर(प्रतिनिधी)बदलापूर येथील बालिके वरील अत्याचार व कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात तसेच महाराष्ट्रामध्ये महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे दि. २४ ऑगस्ट शनिवारी भोकर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
दि.२२ ऑगस्ट रोजी महामहिम राज्यपाल यांना तहसीलदार यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस महिलेवर आणि बालिकेवर शाळेमध्ये आणि शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत, महिला ह्या कुठेच सुरक्षित राहत नाहीत, त्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असेही निवेदनामध्ये म्हटले आहे, या सर्व घटनेचा निषेध म्हणून दि.२४ रोजी शनिवारी भोकर बंद करणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट, यांच्यावतीने निवेदन देण्यात आले
असून शांततेच्या मार्गाने भोकर बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन प्रकाश देशमुख भोसीकर, बाळासाहेब पाटील रावणगावकर, गोविंद बाबा गौड पाटील, एडवोकेट शिवाजी कदम, संतोष आलेवाड, तौसीफ इनामदार, सुभाष पाटील किन्हाळर, निळकंठ वर्षेवार, भीमराव दुधारे, , मनोरमाताई रेड्डी, शफी इनामदार, अफरोज पठाण, सुभाष भालेराव, शिवाजी देवतूळे सुरेश बिल्लेवाड शिवाजी पा. लगळूदकर, मकसूद भाई गोंदवाले, सतीश कदम मातुळकर, धोंडीबा भिसे, बालाजी राजेमोड, विठ्ठल डाखोरे, लक्ष्मण डोंगरे,संजय राऊतवाड, दिगंबर चव्हाण,रमेश गंगासागरे, मारुती झंपलवाड, प्रल्हाद सुंकळेकर,
आदिनाथ चिंताकूटे संदीप सुरगुलवार, वैभव व्यवहारे, सम्राट हिरे, राहुल पुरी, अब्दुल मुखीद, सय्यद आशु, शेख साबिर, आरिफ इनामदार, एडवोकेट मुजाहिद, रज्जाक सेठ प्रेसवाले, हामिद पठान, नइम तळेगावकर सुरेखाताई माळे, कमलताई नर्तावार,शेळके मॅडम, शमीम बेगम, सुरेखा गजभारे, पांडुरंग वर्षेवार, सतीश देशमुख, अँड.परमेश्वर पांचाळ साहेबराव भोम्बे, सुभाष नाईक, रमेश महागावकर, माधव वडगावकर,गंगाधर महादावाड, नंदू पाटील कवठेकर, दत्तात्रय पांचाळ, आनंद चिटे, उमेश कापसे, आनंदराव पाटील, मोहन पाटील आदींनी केले आहे