नवीन नांदेड – पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या नांदेड तालुक्यातील विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिरासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले असून अंतिम टप्यात होत असलेल्या कामासाठी ३० डिसेंबर ते २५ जानेवारी रोजी पर्यंत रस्ता बंद केला असुन भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याच्या वापर करावा व असरजन येथील नव्याने होत असलेल्या पुलावरून पायी चालत येऊन काळेश्वर मंदिर कडे यावे व वाहने संबंधित पार्किंग ठिकाणी लावावेत असे आवाहन ग्रामपंचायत विष्णुपुरीचे सरपंच सौ.संध्याताई विलास हंबर्डे यांनी केले आहे.
विष्णुपुरी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत गावातील मुख्य रस्त्या हा दुतर्फा रस्ता सिमेंट काँक्रीट झाले असुन शेवटच्या टप्प्यात गावातील प्रमुख रस्त्याने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचे काम ३० डिसेंबर ते २५ जानेवारी रोजी पर्यंत होणार आहे, यासाठी पर्यायी रस्ता करण्यात आला असून भाविक भक्तांनी व वाहनधारकांनी नोंद घ्यावी, व नांदेड शहरातुन ,परिसरात येणाऱ्या भाविक भक्तांनी असरजन येथील रस्ता क्रमांक २२ हा पुलाचा लगत असलेल्या पार्कींग ठिकाणी वाहने लावुन पुलावरून पायी चालत जाऊन मंदीर कडे येऊन दर्शन घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय विष्णुपुरी सरपंच प्रतिनिधी सौ.संध्या हंबर्डे यांनी केले आहे.


























