पंढरपूर – नगरपालिका निवडणूकीसाठी भाजपा कडून निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांनी टिळकस्मारक मंदिर येथे सुरु करण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालयातून अर्ज घेऊन जाण्याचे आवाहन भाजपाचे पंढरपूर नगरपालिका निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांनी केले आहे.
राज्यात गेल्या चार वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल अखेर ४ नोव्हेंबर रोजी जाहिर झाला आहे. त्यानुसार राज्यात २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. उमेदवारांना १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज दाखल करावी लागणार आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित करावी लागणार आहेत.
त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी, पंढरपूर यांच्या वतीने पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक २०२५ साठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथे उपलब्ध होणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी वरील वेळेत भारतीय जनता पार्टी मध्यवर्ती कार्यालय, टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथून अर्जाचा फॉर्म घेऊन तो पूर्ण भरून सादर करावा असे देखील आवाहन निवडणूक प्रभारी प्रणव परिचारक यांनी केले आहे.
——————
अर्ज उपलब्ध वेळ –
दि. ०९ नोव्हेंबर व १० नोव्हेंबर २०२५
सकाळी १०.०० ते १.०० व सायंकाळी ३.०० ते ७.००
——————
अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ –
दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ७.०० वा.

















