अकळकोट – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचीही निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असल्याने अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांची निवड करण्यात आली आहे. मैंदर्गी नगर परिषद साठी तहसीलदार शिल्पा ओसवाल तसेच दूधनी नगर परिषद साठी तहसीलदार सरस्वती पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचीही निवडणूक येत्या चार ते पाच दिवसांत जाहीर होण्याची शक्यता गृहीत धरूनच जिल्हा परिषदेसाठी उपजिल्हाधिकारी निवडणूक निर्णय अधिकारी तर मैंदर्गी दूधनी क वर्ग नगरपरिषदांसाठी तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारीची निवड करण्यात आला आहे.अ वर्ग नगरपरिषद असलेल्या पंढरपूर, अक्कलकोट अकलूजसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरित क वर्गातील मैंदर्गी दूधनी नगरपरिषदा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवार द. १० पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे.




















