करकंब : करकंब पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले तत्कालीन प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांची अकलूज येथे प्रशासकीय बदली झाल्याने त्यांच्या रिक्तजागी अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांची नियुक्ती झाली आहे.करकंब ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर यांना शुभेच्छा देत नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांचे स्वागत केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कुंजीर यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी झाली असल्याचे मनोगत व्यक्त केले.सपोनि योगेश लंगुटे याअगोदर मुंबई खार तसेच मुंबई क्राईम ब्रँच,पुणे जिल्ह्यातील बारामती व इंदापूर तसेच अकलूज येथे कार्यरत होते.ते मूळचे बरड ता.फलटण जिल्हा सातारा येथील आहेत.करकंब पोलीस स्टेशनचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आपल्या कामकाजास सुरवात केली आहे.
पोलीस ठाणे करकंब व हद्दीतील गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून शांतता निर्माण करणे,सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करून करकंबसह हद्दीतील गुन्हेगारांवर अंकुश ठेवूत रोडरोमियोवर कायदेशीर कारवाई करणार.
योगेश लंगुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक.
करकंब पोलीस स्टेशन.



















