सोलापूर – जागतिक वृत्तपत्र विकतादिन दरवर्षी १५ ऑक्टोंबर रोजी साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून एकत्व सोशल फाउंडेशन बाळे ने दत्त चौक परिसरातील येथे उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला येथे विक्रेत्यांना पुष्पगुच्छ व पेढे वाटून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टांना आणि महत्त्वपूर्ण भूमिकेला सलाम करण्यात आले.
विशेष म्हणजे भारतरत्न. डॉ,ए,पी,जे, अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवशी हा दिन साजरा केला जातो. डॉ, कलाम यांनी लहानपणी वृत्तपत्रे वाटण्याचे काम केले होते. या कामातून त्यांनी वेळेचे पालन जबाबदारी आणि प्रामाणिकपणा हे जीवनाचे महत्त्वाचे तत्व शिकले, याच प्रेरणेतून यांच्या जन्मदिनी वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान करण्याची ही प्रथा सुरू झाली. उन्हाळा, पावसाळा, थंडी, याचाही पर्वान करता दररोज सकाळी प्रत्येक घरापर्यंत वृत्तपत्र पोचवण्याचे महत्व पूर्ण काम करण्याचा वृत्तपत्र विक्रेत्यांचा कष्टाचे काम हे लक्षात घेता एकत्व सोशल फाउंडेशन बाळे चे प्रमुख दीपक करकी यांनी या वृत्तपत्र विक्रेत्यांचे कौतुक केले यांना आदरने आणि सन्मानित करून या दिनाचा शुभेच्छा देण्यात आले.
या वेळेस चेतन झाडे. किरण सरवळे. कुलदीप पवार. शहाबाज मकानदार, पिरप्पा कोळी, ऋषिकेश हरसुरे, राजेश केकडे, दीपक करकी, राजेश वाघमोडे, आणि वृत्तपत्र विक्रेती मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
विक्रेत्यांच्या सेवा कार्य व कष्टाचा सलाम…
मुसळधार पाऊस, बोचरी थंडी, आजारी असो, भल्या पहाटे वृत्तपत्र वाचका पर्यंत पोचवतात आहात या सेवा कार्य करता याचा आम्हाला अभिमान आहे फाउंडेशनचे प्रमुख दीपक करकीअसे यांनी सांगितले..