अंबड / जालना – दि 11 नोव्हेंबरअंबड घनसावंगी तालुक्यातील नवनियुक्त १०६ पोलिस पाटील यांचा अभिनंदन व सत्कार सोहळा स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ,शहागड तर्फे संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथे संपन्न झाला. यावेळी नव्याने जबाबदारी मिळालेल्या पोलिस पाटीलांना फेटा बांधून, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देत विनायक चोथे यांनी त्यांचे अभिनंदन केले व संवाद साधला तसेच सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षक चंद्रकांत दिलपक सर व पोलिस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष इलियास बागवान यांनी देखील सविस्तर मार्गदर्शन केले.
या सोहळ्यासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर के परदेशी सर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणदादा कंटुले, मा. जि. प. सदस्य शंकर नाना बेंद्रे, घनसावंगीचे माजी नगराध्यक्ष राज देशमुख जी, अंबड नगरी सहकारी पतसंस्थेचे संचालक शिवाजी गाडेकर सर, अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व मुख्याध्यापक श्री जगन दुर्गे सर, राणोजी दादा तौर, डॉ रमेश तारख, संजयजी धोत्रे, रघुनाथराव ताठे त्याच बरोबर पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी श्री अंकुश घोलप, सुनील शिंदे, श्री आर्दड, ज्ञानेश्वर राऊत, भुजंग खोजे, ईश्वर वाघमारे आदी सह पोलिस महाविद्यालयाचे प्राध्यापक, पोलिस पाटील मंडळी व त्यांचे स्नेही कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




















