नरखेड : मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागात बागायती क्षेत्रात व विविध उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने विजेची मागणी वाढत आहे. नरखेड येथे 32 केव्ही महावितरणचे सबस्टेशन आहे. मात्र विजेची वाढती मागणी लक्षात घेता नरखेड येथे मोहोळ, पुळूज व लांबोटी या ठिकाणी असणाऱ्या टीएचव्ही 132 केव्ही सबस्टेशनची आवश्यकता असल्याने नरखेड सबस्टेशनला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी भाजपाचे कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्या कडे लेखी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.त्यावर मुख्यमंत्री ना. फडणवीस यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे पत्र संबंधित विभागाला दिले आहे.
मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागात असणाऱ्या नरखेडसह या भागातील 25 ते 30 गावाच्या बाजूनी सीना, भोगावती व नागझरी या तीन नद्या वाहत आहेत. . नरखेड व भागातील जवळपास 25 ते 30 हजार नागरिकांच्या पाण्याच्या लाईटचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. सध्या बागायत क्षेत्रात वाढ झाल्यामुळे विजेची मागणी वाढलेली आहे. . मोहोळ तालुक्यातील विशेषत नरखेड विभागात होल्टेजची समस्या वाढत असल्याने शेतकरी उदासीन झाला आहे. कधी कधी तर हातात तोंडाशी आलेली पिके वीज पुरवठा व्यवस्थित होत
विजेची वाढती मागणी लक्षात घेता नरखेड येथे मोहोळ, पुळूज व लांबोटी या ठिकाणी असणाऱ्या मोहोळ,पुळुज व लांबोटी प्रमाणेच टीएचव्ही 132 केव्ही सबस्टेशनसारखी आवश्यकता असल्याने नरखेड येथे टीएचव्ही 132 केव्ही सबस्टेशन उभारणी करण्याची मागणी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये लेखी मागणी केली आहे. त्यावर ना फडणवीस यांनी तातडीने सकारत्मकता दर्शवीत या मागणीचा विचार करून अवर सचिव नितीन सुर्वे यांनी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित प्रकाश गंगा वांद्रे कुर्ला संकुल यांना नरखेड येथील 132 केवी सब स्टेशन मंजूर करण्याबाबत पत्र पाठवले असून यावर शासनास तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले.
चौकट-
मोहोळ तालुक्यातील नरखेड हा परिसर मागील २५ ते ३० वर्षापासून विविध विकास कामापासून वंचित राहिला असून या भागाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून सीना भोगावती जोडकालव्याचा प्रकल्प मंजूर होणार असल्याने विजेची मागणी वाढणार असल्याने नरखेड येथे 132 केव्ही सबस्टेशन मंजूर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असता त्यांनी या कामाला सकारात्मकता दर्शवली असून संबंधित विभागाला पत्राद्वारे तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार या 132 केव्ही सब स्टेशन साठी आवश्यक असणाऱ्या साडेबारा एकर जागेची पाहणी ही संबंधीत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून शासनाला सविस्तर अहवाल पाठविला आहे.


























