माहूर / नांदेड – ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, ते लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पलीकडे जाऊन अधिक व्यापक आणि विशेषीकृत वैद्यकीय सेवा पुरवते. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा तथा ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सेवा पुरवणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या ग्रामीण रुग्णालयात चांगली वैद्यकीय उपचार सेवा मिळणे अपेक्षित असते.
परंतु, माहूरचे ग्रामीण रुग्णालय हे वाढलेल्या रुग्ण संख्येपुढे व तोकड्या सोई-सुविधांमुळे अपुरे पडत असल्याने विशेष बाब म्हणून माहूर येथे
उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची मागणी माहूरगडावर देवदर्शनानिमित्त आलेले केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव गणपतराव जाधव यांच्याकडे नगरसेवक तथा भाजपा शहराध्यक्ष गोपूभाऊ उर्फ सागर महामुने यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
माहूरचे ग्रामीण रुग्णालय हे ग्रामीण भागातील लोकांसाठी आरोग्य सेवा पुरवणारे महत्त्वाचे केंद्र असल्याने, लोकांना तालुक्याच्या ठिकाणी चांगली वैद्यकीय मदत मिळणे अपेक्षित असते. परंतु,डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची कमतरता, पायाभूत सुविधांचा अभाव आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा पोहोचवण्यातील अडचणी ही माहूरच्या ग्रामीण रुग्णालयास भेडसावणारी प्रमुख आव्हाने आहेत. हे ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असून, ते लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या पलीकडे जाऊन अधिक व्यापक आणि विशेषीकृत वैद्यकीय सेवा पुरवते. परंतु,ते माहूरच्या वाढलेल्या रुग्ण संख्येपुढे तोकडे पडत आहे. त्यामुळे याठिकाणी
उपजिल्हा रुग्णालय स्थापन करणे गरजेचे झाले आहे.
ग्रामीण रुग्णालय हे मूलभूत आरोग्य सेवांवर लक्ष केंद्रित करत असल्याने माहूर येथे ५० खाटांची क्षमता असलेले उपजिल्हा रुग्णालय जिथे डॉक्टर, परिचारिका आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा (जसे की आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, प्रयोगशाळा) उपलब्ध होतील.जेणेकरून स्थानिक जनतेला आरोग्य सेवा मिळू शकेल आणि जिल्हा रुग्णालयावरील भार कमी होईल, विशेषतः माहूर सारख्या दुर्गम डोंगराळ भागात हे उपजिल्हा रुग्णालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
माहूर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर केल्यास हे ग्रामीण रुग्णालयापेक्षा अधिक विशेषज्ञ सेवा (उदा. शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग) आणि प्रशिक्षित कर्मचारी पुरवत अधिक व्यापक सेवा देण्यासाठी सक्षम ठरणार आहे.
या सर्व बाबी विचारात घेऊन विशेष बाब म्हणून येथे एक उपजिल्हा रुगणालय मंजूर करण्याची मागणी नगरसेवक गोपू महामुने यांनी मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजप शहर सरचिटणीस कैलास फड, युवा मोर्चा शहर अध्यक्ष पवनसिंह चौहान, शिवसेनेचे हिरासिंग चव्हाण राठोड यांची उपस्थिती होती.
आता उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी देणे हे राज्य सरकार, आरोग्य विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांचा आणि प्रशासकीय मान्यतेचा भाग असून ,ज्यामध्ये जिल्हा आरोग्य सोसायटीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
तर आता चक्क केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्याकडेच अन् तेही साक्षात श्री रेणुकादेवीच्या साक्षीने माहूर येथे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याची मागणी करण्यात आली असल्याने, ते सदरील मागणी नक्कीच पूर्ण करतील अशी अपेक्षा माहूरकर व्यक्त करीत आहेत.

























