सांगोला – गुंफण अकादमी, कराड यांच्या गुंफण सामाजिक पुरस्काराने सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानला मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे संपन्न झालेल्या २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात सन्मानित करण्यात आले.
संमेलनाध्यक्ष गझलकार सुनंदा शेळके, भारती विद्यापीठ पुणेचे सह-कार्यवाह डॉ.महादेव सगरे, माजी जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय बोरुडे, बबन पोतदार, जयसिंग कळके, गुंफण अकादमीचे अध्यक्ष बसवेश्वर चेणगे, गजानन चेणगे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके देऊन आपुलकी सदस्यांना गौरविण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रभाकर सरगर, अच्युत फुले, महादेव दिवटे, सुरेश चौगुले, अरविंद डोंबे, प्रा.बाळासाहेब शेंडे, दिपक बंदरे, विश्वासराव पाटील, दत्तात्रय नवले, श्रीकांत देशपांडे, वसंत सुपेकर, प्रथमेश यादव, जितेंद्र बोत्रे, श्रीयश नवले उपस्थित होते.


























