धाराशिव – धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 14-अ मध्ये रंगत वाढली आहे. या प्रभागातून अर्चना विशाल शिंगाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या तर्फे नगर परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी सोमवार 17 नोव्हेंबर रोजी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख आणि नीता अंधारे यांच्या कडे दाखल केला आहे.
अर्ज सादर केल्यानंतर अर्चना शिंगाडे यांनी बोलताना प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांचे काम, स्वच्छता व्यवस्थापन, महिलांसाठी उपयुक्त योजना आणि युवकांसाठी रोजगारपर उपक्रम या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल शिंगाडे, सारीपुत शिंगाडे, सुगत सोनवणे उपस्थित होते.


















