अर्धापूर तालुक्यातील मेंढला बू येथील राज्य महामार्ग ते गावात जाणार्या मुख्य रस्त्यावरील नाल्याच्या जवळील नव्याने केलेला डांबर रस्ता पुराच्या पाण्याने वाहून गेल्याने गावात ये जा करण्यासाठी नागरिकांना प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. आजपर्यंत कित्येक नागरिक, शाळकरी विद्यार्थी, महिला हे या रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे जखमी झालेले आहेत. कित्येक नागरिकांच्या वाहनांचे हजारो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
वारंवार प्रशासनाकडे विनंती, तक्रार करून देखील प्रशासनाकडून अद्यापपर्यंत यावर कोणत्याही प्रकाराचा तोडगा काढण्यात आलेला नाही. येत्या 10 तारखेपर्यंत यावर जर तोडगा काढण्यात नाही आला तर या रस्त्यावरील नाल्यामध्ये आम्ही जलसमाधी घेणार असल्याचा इशारा आज प्रशासनाला देण्यात आला. प्रसंगी मेंढला (बू) येथील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते…