सांगोला – कराटे इंडिया ऑर्गनायझेशन या राष्ट्रीय संघटनेच्या मान्यतेने कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या आयोजनाने नाशिक येथे झालेल्या पश्चिम विभागीय कराटे स्पर्धेत सांगोला येथील वाघमारे कराटे क्लासची गेनशीरियो कराटे शाखेची खेळाडू आरोही सावंत हिने रोप्य पदक मिळवून दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत आपले स्थान पक्के केले.
आरोही सावंत हिने ५० किलो वरील कमीते गटामध्ये रोप्य पदक मिळविले. आरोही सावंत हिला सुनील वाघमारे, श्रावणी वाघमारे, निजेेंद्र चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. ती विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, सांगोला येथे इयत्ता सातवी मध्ये शिकत आहे.























