करमाळा- अहिल्यानगर जिल्हा सोनई गावात मातंग समाजातील एका तरुणावर काही नराधमांनी अमानुषपणे मारहाण करून त्याच्या पायावरून गाडी घातली तसेच धारदार शस्त्राने डोळ्यावर वार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.
या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून समाजात तीव्रसंतापाची लाट उसळली आहे.या घटनेचा मातंग एकता आंदोलन करमाळा महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.
यावेळी संघटनेच्या वतीने प्रमुख मागण्या : सर्व आरोपीना तात्काळ अटक करावी,सदर आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करावी,सदर घटनेतील अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यात यावा, सदर वैरागर परिवाराला पोलीस सौरक्षण मिळावे. अश्या मागण्या करण्यात आल्या यावेळी भारतीय मुक्ती मोर्चा चे तालुका अध्यक्ष भिमराव कांबळे यांनी पत्र देऊन पाठिंबा दिला.
यावेळी मातंग एकता आंदोलन संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद पवार,शहराध्यक्ष युवराज नामदेव जगताप, चेतन आलाट, बबन आलाट,अभिजित मंडलिक, तालुका युवक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष रेवन शिंदे ,शहरउपाध्यक्ष विश्वराज आलाट, सोनू आलाट, अक्षय आलाट, कृष्णा आलाट , प्रतिक आलाट, उपस्थित होते.


















