सोलापूर – हजारो वर्षापासुन चालत आलेल्या पंरपरेनुसार श्रीशैल कावडचे आगमन गुरूवारी सकाळी 9 वाजता जोडबसवण्णा चौकातील हनुमान मंदीरात आगमन झाले.
सोलापुर सिध्देश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बु व सुधीर देशमुख यांच्या कुटुंबाकडुन पुजा आरती होवुन सिध्देश्वर मंदिर येथे दिवसभर मुक्काम करून त्या ठिकाणी सर्व मानकरी नैवेध्य व आरती दाखवता. संध्याकाळी ५.३० वाजता पुजा झाल्यानंतर ती कावड मल्लिकार्जुन मंदिरात येथून बाजार पेठातुन मिरवणुक मार्गे देशमुख यांच्या वाड्यात विसर्जन होते.
यावेळी श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर महायात्रेचे प्रमुख मानकरी श्री राजशेखर हिरेहब्बु, सुधीर देशमुख, सागर हिरेहब्बु, ओकांर हिरेहब्बु, सुधीर थोबडे, सोमनाध मेंगाणे बाळासाहेब मुस्तारे, संजय दर्गोपाटील, अनंत अंजीखाने, गंगाधर कल्याणकर, साईनाथ अंजीखाने श्रीकांत हवीनाळ, सिद्धेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष शैलेश वाडकर, गजानन धोत्रे, शिवा सोन्ना, शिवशंकर कंटीकर, सिद्धेश्वर कंटीकर, प्रकाश पत्री स्वामी, संतोष स्वामी मदगेरी, मल्लय्या स्वामी कुंभारी, तम्मा कल्याणशेट्टी आदी उपस्थिती होती.
























