नांदेड / बिलोली – गेल्या अनेक वर्षापासून शेवटच्या घटकातील जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत असलेले सेवाभावी व्यक्तिमत्व प्रदुम पाटील चिंचाळकर यांची पत्नी अरुणा पाटील चिंचाळकर हिने आरक्षण सुटलेल्या सर्वसाधारण महिला पंचायत समिती कासराळी गणासाठी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे.
कासराळी पंचायत समिती गण राजकीय समीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, यावेळी सदर पंचायत समिती गण खुला प्रवर्ग महिलासाठी असून, सौ अरुणाताई प्रदुम पाटील चिंचाळकर हे चिंचाळा गावातील रहिवासी आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आर्थिक दृष्ट्या वंचित घटकांना सर्वांगीण विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रदुम पाटील नेहमी कार्यतत्पर असतात.
ग्रामीण भागातील धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक सामाजिक आदी उपक्रमांना अग्रक्रम देत सौ.अरुणाताई पाटील ग्रामीण भागातील असल्याने आसपास गावातील नागरिकांना ते चांगले परिचित आहेत. त्यांच्या यशस्वी कार्याची दखल घेत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जेजेराव पाटील करडखेडवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष बिलोली शिवश्री प्रदुम पाटील चिंचाळकर यांच्या नेतृत्वाखाली कासराळी गणातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हा मतदारसंघ खुला प्रवर्गा महिलांसाठी अधिकृत घोषणा झाल्या असून या निर्णयामुळे गावातील राजकीय समीकरणांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
 
	    	 
                                




















 
                