कुर्डूवाडी – सोलापूर जिल्हा तायक्वांदो असोसिएशन यांच्यामार्फत दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये जिव्हाळा सुसंस्कार विद्यामंदिर कुर्डूवाडी येथील इयत्ता नववीचा विद्यार्थी चि.आर्यन महेश खांडेकर याने प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची गोवा या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
त्याच्या या अभूतपूर्व यशाबद्दल व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवराज वायचळ ,सचिव अजित वायचळ, मुख्याध्यापिका श्रीम सारिका गोटे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, केंद्र समन्वयक लक्ष्मण कारंडे यांनी अभिनंदन केले.

















