Saturday, November 15, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूंचे रहस्य काय? कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू? वाचा सविस्तर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 27, 2023
in india
0
देशात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू, वाघांच्या मृत्यूंचे रहस्य काय? कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू? वाचा सविस्तर
0
SHARES
65
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतात आढळणाऱ्या पट्टेदार वाघ वाचविण्यासाठी अनेक उपाययोजना करुनही वाघांचे अनैसर्गिक मृत्यू होतच आहेत. २०२३ या वर्षात तब्बल २०३ वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच ५३ वाघांचा वर्षभरात मृत्यू झाला आहे.

 

भारतात आढळणारा पट्टेदार वाघ वाचविण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी काही वर्षांत अनेक प्रयोग आणि उपाययोजना झाल्या. असे असतानाही देशभरात विविध कारणांनी वाघांचे अनैसर्गिक मृत्यू होत आहेत. यंदा भारतात २०३ वाघांचे मृत्यू नोंदविण्यात आले. त्याचवेळी, महाराष्ट्रात ५३ वाघांचे मृत्यू झाल्याची आणि देशात पहिल्यांदाच आपले राज्य या बाबतीत सर्वोच्च स्थानी आल्याची आकडेवारी समोर आली. धक्कादायक म्हणजे, मागील दशकभराच्या काळातील हे सर्वाधिक व्याघ्रमृत्यू असल्याचे निष्पन्न झाले आहे. यांपैकी अनेक मृत्यू अनैसर्गिक आहेत. त्यामुळे, अनेक उपाय करूनही देशभरातील यंत्रणांना वाघांच्या वाढत्या अनैसर्गिक मृत्युसंख्येवर अंकुश लावता आलेला नाही.

 

 

-संख्या वाढल्याने झाले का मृत्यू?

वाघांच्या मृत्युंमध्ये वाढ झाली आहे, हे मांडतांनाच वाघांच्या एकंदर संख्येतही वाढ झाल्याचे वास्तव आहे. २०२२च्या व्याघ्रगणनेनुसार देशात एकूण ३,६८२ वाघ आहेत. आधीच्या तुलनेत एकूण ७१५ वाघ देशांच्या विविध जंगलांमध्ये वाढले असल्याचे या गणनेतून स्पष्ट झाले. ही व्याघ्रसंख्या बरीच मोठी आहे आणि व्याघ्रमृत्यूंचा विचार या वाढलेल्या व्याघ्रसंख्येच्या आधारावर करावा लागणार आहे. मात्र, केवळ याच एका कारणामुळे वाघांची मृत्युसंख्या वाढली असे नाही. अलीकडे शिकारींचे वाढलेले प्रमाण आणि त्यातील संघटित गुन्हेगारीचा समावेश हा चिंतेचा विषय आहे.

 

 

-का मारले जातात वाघ?

वय झाल्यामुळे किंवा जंगलातील दोन वाघांमधील संघर्षात झालेले मृत्यू नैसर्गिक समजले जातात. याव्यतिरिक्त जेथे जेथे मानवी हस्तक्षेप असेल, अशा व्याघ्रमृत्यूंना अनैसर्गिक म्हटले जाते. यामध्ये, रस्त्यावरील वाहने किंवा रेल्वेची धडक, विद्युतधक्का, शिकार, पाणवठ्यात विष कालवणे, जंगलात फिरताना कठडे नसलेल्या विहिरी किंवा अन्य जलाशयांत पडणे, अशा विविध कारणांमुळे ‌वाघांचे मृत्यू होतात. या सर्व मृत्यूंचा अनैसर्गिक मृत्यूंमध्ये समावेश होतो. मागील पाच वर्षांत व्याघ्रमृत्यूंमध्ये झालेल्या वाढीत या अनैसर्गिक मृत्यूंचा वाटा मोठा आहे. त्यातही, शिकार आणि विद्युतधक्क्याने होणारे मृत्यू या प्रकारांचा सर्वाधिक समावेश आहे. देशातील २०३ मृत्यूंपैकी १४७ हे नैसर्गिक आणि ५५ अनैसर्गिक आहेत.

 


-संघटित शिकारीचे मूळ काय?

महाराष्ट्रात एकूण ५३ वाघमृत्यू नोंदविण्यात आले. त्यामध्ये, संघटित शिकारी टोळ्यांनी केलेल्या वाघांच्या शिकारींचाही समावेश आहे. जुलैत चंद्रपूर जिल्ह्यात ‌शिकार झालेल्या वाघाची कातडी आसाममध्ये जप्त करण्यात आली होती. त्यानंतर, एक मोठे शिकारी नेटवर्कच उघडकीस आले आणि त्यावर कारवाई झाली. २०१३ नंतर महाराष्ट्रात इतक्या संघटितपणे शिकारी पुन्हा सुरू झाल्याचे या घटनेने सिद्ध केले. या शिकारींमध्ये हरियाणा आणि पंजाब राज्यांमधील बवेरिया या भटक्या आणि शिकारीसाठी कुख्यात असलेल्या शिकाऱ्यांचा समावेश आहे. देशभरात वाघांची शिकार करून देशात आणि देशाबाहेर अवयवांची विक्री करण्याच्या उद्योगात हे शिकारी असतात. याशिवाय, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या कटनी परिसरातील बहेलिया समुदायही संघटित शिकारींसाठी ओळखला जातो. यातूनच अलीकडे वाघांचे मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. या सगळ्याच्या मुळाशी वाघ आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीतून येणारा पैसा आहे.

 

 

-कसे थांबणार अनैसर्गिक मृत्यू?

देशात सर्वाधिक व्याघ्रमृत्यू महाराष्ट्रात झाले. एकूण ५३पैकी निम्म्याहून अधिक मृत्यू चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील आहेत. दरवेळी सर्वाधिक व्याघ्रमृत्यू होणाऱ्या शेजारच्या मध्य प्रदेशात यंदा ४७ मृत्यू नोंदविले गेले. त्या खालोखाल उत्तराखंडमध्ये २६, तमिळनाडूमध्ये १५ आणि केरळमध्ये १४ वाघांना विविध कारणांनी जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नातून वाघांची संख्या वाढली, याबद्दल आनंद व्यक्त होतो. मात्र, या वाघांना सामावून घेण्यासाठी पुरेसे जंगल आहे का, त्यांच्या भ्रमणाचे मार्ग उपलब्ध आहेत का, मानवी वस्तींवरील होणारे हल्ले, जंगलातील अतिक्रमणे आणि जंगलांची सुरक्षा असे अनेक मुद्दे या वाघांच्या जन्म-मृत्यूच्या चक्राशी जोडले गेले आहेत. त्यांची बदलणारी समीकरणे वाघांच्या आकडेवारीतही बदल करतात. वाघांचे अनैसर्गिक मृत्यू रोखण्यासाठीही या उपाययोजना योग्य प्रकारे होणे, हीच महत्त्वाची बाब आहे.

Post Views: 63
Previous Post

सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे कसायांच्या अड्ड्यावर छापा टाकून 44 वासरे व 4 गायीचे प्राण वाचविण्यात यश

Next Post

राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावच्या संवर्धन करण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावच्या संवर्धन करण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी

राजराजेश्वर यशवंतराव होळकरांच्या किल्ले वाफगावच्या संवर्धन करण्याची गोपीचंद पडळकरांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोशल मीडियावर जातीय तेढ आक्षेपार्य वादग्रस्त पोस्ट टाकल्यास गुन्हा दाखल होणार…

November 14, 2025

मुदखेड येथे मतदान जनजागृती रॅली संपन्न

November 14, 2025

राष्ट्रवादीने निष्ठावंतांना डावलल्याने आगामी निवडणूकीत उमेदवारच मिळेना!

November 14, 2025

भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषि समृद्धी योजनेचा लाभ घ्यावा -दिलीप जाधव

November 14, 2025

हाणेगाव जिल्हा परिषद गण विकासापासून कोसो दुर

November 14, 2025

सहस्त्रकुंड धबधब्यात अडकलेल्या पाच महिला व दोन बालकं बालंबाल बचावले

November 14, 2025

संस्कृती वऱ्हाडची राज्यस्तरीय धावपटू म्हणून झळकणारी कांस्य कामगिरी !

November 14, 2025

बिहार निवडणूक विजयाचा परतुरात जल्लोष, राहुल लोणीकर यांच्या उपस्थितीत आनंदोत्सव साजरा

November 14, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

उप मुख्यमंत्री अजित पवारांचा लवकरच सोलापूर दौरा, निवडणुकीचा आढावा घेणार 

byतरुण भारत
November 13, 2025
0

सोलापूर - सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाले. यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...

भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का… प्रथमेश कोठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

byतरुण भारत
November 12, 2025
0

  सोलापूर - महापालिका पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे. शरद...

भाजपाकडून नगरसेवक पदासाठी २२४ जण तर नगराध्यक्षपदासाठी ८ महिला इच्छुक

byतरुण भारत
November 11, 2025
0

पंढरपूर - पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आता वातावरण तापू लागलेले आहे. भाजपाकडून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या मंडळींच्या मुलाखती स्वत:...

निरीक्षक शेखर माने यांची पदमुक्त करण्याची मागणी

byतरुण भारत
November 11, 2025
0

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी निरीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697