जेऊर – करमाळा येथील जीवन शिक्षण फौंडेशन या शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक प्रा.जयेश पवार यांची शस्त्रांग मार्शल आर्ट सोलापूर जिल्हा कार्यक्षेत्रासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सचिव मिलिंद कॅटमोरे तनू ही नियुक्ती केली असून सचिवपदी अमोल माळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्हयातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व तरुणांचा व्यक्तीमत्व विकास, खेळ आणि सामाजिक आरोग्य यांचा समन्वय साधत संस्कारक्षम संपन्न यूवा पिढी निर्माण व्हावी या उद्देशाने शस्त्रांग मार्शल आर्ट महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्य सुरू आहे.
समाजातील प्रभावशाली व्यक्तींकडून भारतीय तरुणांना दिशादर्शनाचे कार्य योग्य पद्धतीने होते त्यामुळे अशा समाजमान्य व्यक्तींचा संघटनेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन या विधायक कार्याची व्याप्ती वाढावी हा या संघटनेचा मानस आहे. या दृष्टीने प्रा.पवार यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती महत्वाची मानली जात आहे.
शस्त्रांग मार्शल आर्ट संघटनेचे राज्य सचिव मिलींद काटमोरे यांनी प्रा.पवार यांची सन 2025 -26 या वर्षासाठी जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्ली आहे. निवड झाल्याचे लेखी पत्र सुपुर्द करून त्यांनी प्रा. जयेश पवार यांचे अभिनंदन केले. जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील यांनी संस्था कार्यालयात प्रा .पवार व माळी यांचा सन्मान करून शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे , विश्वस्त भारतराव शिंदे-पाटील , प्रोलक्स कंपनीचे संस्थापक व कार्यकारी संचालक डॉ. प्रचिती पुंडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश करे- पाटील,अक्कलकोट येथील कार्यकारी विश्वस्त प्रथमेश इंगळे, सोलापूर जिल्हा इंग्लीश टिचर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. बाळकृष्ण लावंड, लोकविकास फार्मर्स कंपनीचे वैभव पोळ, गजेंद्र पोळ, यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनचे अध्यक्ष प्रा.कल्याणराव साळुंके, प्रा. विष्णू शिंदे, पाटबंधारे विभागाचे अमियंता अतुल दाभाडे, प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. निलेश मोटे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.


















