सोलापूर – महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर होताच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जोरदार हालचालींना वेग आला आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर तातडीने मंगळवारी दुपारी पार्क चौकातील शहराध्यक्ष संतोष पवार यांच्या कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सोलापुरातील सर्व प्रभागात राष्ट्रवादीच्या बैठका घेऊन आगामी महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची ताकद दाखविण्यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच महापालिका निवडणुकीत सर्वधर्मीय उमेदवारांना सामावून घेऊन महापालिकेत सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्याचाही निर्धार व्यक्त करण्यात आला.
सोलापूर शहराच्या विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोट्यवधींचा निधी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून पिण्याचे पाणी,रस्ते यासह नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यात आला आहे.याशिवाय पालकमंत्री असताना दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातूनसुद्धा अनेक प्रभागामध्ये विकासकामे पूर्ण करण्यात आलेली आहेत. सोलापूरकरांना या कामाची जाणीव आहे. तसेच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर जाताना राष्ट्रवादीने केलेली कामे सांगून उमेदवारांना निवडून देण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणानुसार त्या त्या प्रभागात बैठक घेऊन इच्छुक उमेदवार आणि विद्यमान नगरसेवक यांची सांगड घालून ” अब कि बार ५० पार ” चा नारा देत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यावर लक्ष्य केंद्रित करणार असल्याचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले.
या बैठकीला शहराध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल ,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे,ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा,माजी सरचिटणीस प्रमोद भोसले ,माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,महिला अध्यक्षा संगीत जोगदनकर ,युवक अध्यक्ष सुहास कदम,माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर ,गणेश पुजारी,वाहिदा शेख,ओबीसीचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम नदाफ,प्रदेश सचिव इरफान शेख,अल्पसंख्यांकचे राष्ट्रीय सचिव फारूक मटके ,अविनाश भडकुंबे उपस्थित होते.




















