अक्कलकोट – गेल्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांच्या विविध १४ मागण्यांबाबत आमरण उपोषणास बसलेले शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानवरे यांची प्रकृती खालवल्याने प्रशासन कडून सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आली असून दवाखान्यात दाखल केल्यानंतरही बुक्कानुरे यांनी कोणताही उपचार गोळी औषध न घेता आमरण उपोषण आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
या आंदोलनाकडे शासन स्तरवरुन दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील अनेक शेतकरी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन जाहीर पाठिंबा देत आहेत. प्रशानाने शेतकऱ्यांचा स्थानिक मागण्यावर लवकरात लवकर तोडगा काढुन शेतकऱ्यांचा काही मागण्या मान्य करून त्यांचे आमरण उपोषण थांबवावे. अन्यथा याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत. प्रत्येक गावात चावडी वाचन करुन वंचित गोरगरिबांचा मोफत रेशन अन्नसुरक्षा योजेनेत समाविष्ट करावा.जे साखर कारखाना शेतकऱ्यांचे ऊस बिल थकवलेले आहे अशा कारखानदारांना चालु हंगामात गाळप परवाना देऊ नये.अक्कलकोट मधील सौर ऊर्जा कंपनीमुळे लाखो झाडाची कत्तल करून पर्यावरणाचा हानी केली आहे, त्या सर्व सौर ऊर्जा कंपनीकडून एक हजार एकरामागे किमान शंभर एकर जमिनीवर ताबडतोब वृक्ष लागवड करुन घ्यावी.अक्कलकोट तालुक्यातील मटका, जुगार, हातभट्टी, गुटका लॉज मधील अवैध व्यवसाय धंदे बंद करावे. शेतक-यांची सर्व पिके तुर, कापूस, सुर्यफुल, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, गहू, सह सर्व पिक शासनाच्या हमीभावाप्रमाणे शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत खरेदी करावे. अतिवृष्टीमुळे व पुरपरिस्थितीमुळे शेतक-यांना कमीत कमी हेक्टरी ५० हजार रुपये पीक विमा रक्कम मिळावे.अशी किमान पाच सहा स्थानिक मागण्या प्रशासनाचे अधिकारी तात्काळ सोडविण्यासाठी गांभीर्य दाखवत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
तहसीलदार विनायक मगर पोलिस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी ग्रामीण रुग्णालयात भेटी देऊन शेतकऱ्यांचे १४ मागण्या बाबत संबंधित साखर कारखाना चेअरमन तात्काळ प्रश्न सोडण्यावाण्या बाबत शुक्रवारी ३१ रोजी बैठक आयोजित केली आहे.
गुरवारी सकाळी ११ वाजता तालुक्यातील तमाम शेतकरी बंधूंच्या वतीने एम एस बी बायपास चौक जवळ सोलापूर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.


















